sinhgad
भक्तीचे मळे फुलवत वाटचाल सुरू
Thursday, October 20, 2011
Wednesday, May 5, 2010
Sunday, June 28, 2009
अकलूजला पार पडलं तिसरं गोल रिंगण

अकलूजला पार पडलं तिसरं गोल रिंगण
संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं तिसरं रिंगण आज पार पडलं। अकलूज - इथल्या सदाशिवराव माने विद्यालयाच्या आवारात संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं तिसरं आणि शेवटचं गोल रिंगण आज (ता.२८) पार पडलं. तत्पूर्वी, जिल्ह्याचे पालकमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी सपत्निक आणि सरपंच संग्रामसिंह मोहिते यांनी अकलूजमध्ये स्वागत केलं. संपूर्ण पालखी सोहळ्यातलं आखीव, रेखीव आणि नेटकं व्यवस्थापन असणारं हे गोल रिंगण पाहण्यासाठी राज्यातून अनेक भाविक, अभ्यासक, आवर्जून उपस्थित राहतात. या गोल रिंगणानंतर होणारे संत खेळ खेळण्यात आणि पाहण्यात एक वेगळाच आनंद असतो. टाळकरी, पखवाजवादक आदी भाविक तसंच डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिलांनी चोपदारांच्या सुचनेनुसार तीन प्रदक्षिणा पूर्ण केल्या. त्याचवेळी अचानक मोहिते पाटील यांचा आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा अश्व रिंगण तोडून बाहेर पडले. या घटनेत एक जण जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याशिवाय अन्य तीन ते चार वारकरी किरकोळ जखमी झाले. भक्तनिवासासाठी एक कोटीदेहूतल्या भक्तनिवासासाठी एक कोटी रुपये देण्याची घोषणा राज्याचे ग्रामविकासमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी आज इथं केली. त्यासाठीची प्रक्रिया १५ दिवसांत सुरु करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं.

डोणजे रेव्ह पार्टीतील २१ जणांची मुक्तता
डोणजे रेव्ह पार्टीतील २१ जणांची मुक्तता
पुणे - सिंहगड पायथ्याजवळील डोणजे गावाजवळ झालेल्या रेव्ह पार्टीत अमली पदार्थांचे सेवन केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल झालेल्या २८० युवक-युवतींपैकी २१ जणांची अमली पदार्थ द्रव्यसेवन केल्याच्या आरोपातून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. बी. भागवत यांनी मंगळवारी मुक्तता केली; मात्र सार्वजनिक ठिकाणी बीभत्स वर्तन केल्याचा आरोप त्यांच्यावर कायम ठेवण्यात आला आहे. डोणजे गावाजवळ चार मार्च २००७ रोजी पहाटेच्या सुमारास जिल्हा पोलिसांनी छापा घालून २८० युवक-युवतींना अटक केली होती. त्या वेळी घटनास्थळी अमली पदार्थांचा मोठा साठा सापडला होता. पकडण्यात आलेल्या सर्वांची सखोल वैद्यकीय तपासणी तपासणी झाली होती. न्यायवैद्यक प्रयोगशाळेतून या चाचणीचा अंशतः अहवाल न्यायालयात नुकताच दाखल झाला. त्यात २१ जणांनी सेवन केले नव्हते, असे म्हटले आहे. त्याच्या आधारे सेवनाच्या आरोपातून मुक्तता करावी, असा अर्ज २१ जणांच्या वतीने ऍड. सुरेशचंद्र भोसले, ऍड. श्रीकांत शिवदे, ऍड. मिलिंद पवार, ऍड. प्रसाद कुलकर्णी आदींनी केला होता.
वाचकांच्या प्रतिक्रिया
On June 24th 6:06 PM, anand bapat said:
All the people should unite and outcast all the concerned police officials, advocates/lawyers and the lab people. No body should attend any social event at their home and do not invite them to your places. Remember Baba Bhide and Manju Sarda case?
On June 24th 5:06 PM, shivanand said:
how much people earns to give such report need to find out
On June 24th 5:06 PM, sachin said:
if it was in malaysia or any other middle-eastern country then they would have been hanged to death in 2007 itself.
On June 24th 5:06 PM, s said:
please ek party madhi group photo patva...live patry madhil bhetla tar aati uutam....... jai ho
On June 24th 4:06 PM, abcd said:
atta hya 21 janata sagali badyanchi mule sutali asnar, report kay kasahi tayar karun milato halli.
On June 24th 3:06 PM, Deepak said:
डोणजे गावाजवळ चार मार्च २००७ रोजी पहाटेच्या सुमारास जिल्हा पोलिसांनी छापा घालून २८० युवक-युवतींना अटक केली होती. त्या वेळी घटनास्थळी अमली पदार्थांचा मोठा साठा सापडला होता. Ha satha gamantisathi thevala votha, knonihi tycha wapar kelela disat nahi. Good, Very good,
On June 24th 12:06 PM, veryharsh said:
चार मार्च २००७ la ghadaleli ghatana aani न्यायवैद्यक प्रयोगशाळेतून या चाचणीचा अंशतः अहवाल न्यायालयात नुकताच दाखल झाला. itke diwas ऍड. सुरेशचंद्र भोसले, ऍड. श्रीकांत शिवदे, ऍड. मिलिंद पवार, ऍड. प्रसाद कुलकर्णी hyana sagle manage karnyasathi laagala ka? hats offffff to india.
On June 24th 11:06 AM, Vilas said:
Another new" Police javal 20 gr GANJA sapadala... tyala kadhun takale.... MONEY MATTERs.... if you want to do wrong thing ... first earn huge money... they u can do whatever u want..... GREAT INDIA...
On June 24th 10:06 AM, Rajendra Jadhav said:
Jai ho

Prasang ahe March 2007 madhala, chachanicha "anshatha" ahaval nukatach dakhal jhaala. Ya kartabagarisathi kunkunache kautuk karayche. Kharach Bharat ek Superpower aahe.
On June 24th 3:06 AM, sabu said:
Ye To Hona Hi Tha!

तुकोबारायांची पालखी वरवंडला
तुकोबारायांची पालखी वरवंडला
राजेंद्रकृष्ण कापसे
वरवंड (ता. दौंड) - संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील मुक्कामाच्या ठिकाणी आरतीसाठी जमलेला वैष्णवांचा मेळा. (छायाचित्र - रमेश वत्रे)
वरवंड - समाजआरतीला "ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष, त्याला टाळ-मृदंगांची साथ अन् तुकोबांचा रथ येताच टिपेला पोचलेला गजर... अशा भक्तिरंगात चिंब झालेला संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा मुक्कामासाठी साडेसहा वाजता वरवंड येथे विसावला. शनिवारी संध्याकाळी झालेल्या पावसामुळे जमीन ओली झाली होती. त्यामुळे जिल्हा प रिषद व विद्या विकास मंदिरातील व्हरांड्याचा वारकऱ्यांना आसरा मिळाला. पहाटे महावीर परिवार व कृषी आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी सपत्नीक पादुकांची पूजा केली. या वेळी विश्वस्त विश्वजित मोरे उपस्थित होते. सकाळी सहा वाजता सोहळा मार्गस्थ झाला. भां डगाव येथे दुपारच्या विसाव्यासाठी सोहळा सकाळी अकराच्या सुमारास पोचला. गावकऱ्यांनी पालखी रथातून खांद्यावर घेतली आणि रोकडोबानाथ मंदिरात विसाव्यासाठी ठेवली. गोपाळ यांनी महानैवेद्य दाखविला. त्यानंतर वारकरी व भाविकांना पिठले-भाकरीचा प्रसाद देण्यात आला. भांडगावहून दुपारी एक वाजता सोहळा मार्गस्थ झाला. चौफुला येथील विसाव्यासाठी सोहळ्याचे आगमन साडेतीन वाजता झाले. या वेळी अध्यक्ष सोनबा मोरे, सूर्यकांत मोरे, संजय मोरे, राजेंद्र मोरे तुकोबांच्या रथाचे सारथ्य करीत होते. शिरूर-सातारा रस्त्यावरील २५ गावांतील भाविक दर्शनासाठी आले होते. सव्वाचारच्या सुमारास जोरदार पाऊस आला. त्यामुळे वारकऱ्यांनी दुकाने, घरे, वाहनांचा आसरा घेतला. अनेकांना उभे राहूनच विसावा घ्यावा लागला. पाऊस सुरू असतानाच साडेचार वाजता सोहळा मार्गस्थ झाला. चौफुला येथील तमाशा कला केंद्राच्या कलाकारांनी अन्नदान केले. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी सोहळा वरवंड गावाजवळ पोचला. गावातील विठ्ठल-रुक्मिणी मं दिरासमोर दिंडीतील पताका, टाळकरी, विणेकरी, पखवाज वादक अर्धवर्तुळाकार उभे रा हिले. ज्ञानोबा-तुकारामाचा जयघोष सुरू झाला. टाळकऱ्यांनी मृदंगाच्या स्वरावर ताल धरला. त्यानंतर चोपदारांनी चोप उंचावून समाजआरती घेतली. सोमवारी सकाळी रोटी घाटमार्गे पालखी दौंड तालुक्यातून बारामती तालुक्यात प्रवेश करणार आहे.

तुकोबांची पालखी लोणी काळभोरला विसावली
तुकोबांची पालखी लोणी काळभोरला विसावली
राजेंद्रकृष्ण कापसे लोणी काळभोर - रस्त्याच्या दुतर्फा विविध फुलांचे ताटवे; त्यातच पावसाची हजेरी...अशा उत्साही वातावरणात संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा शुक्रवारी लोणी काळभोरमध्ये रात्री पावणे आठ वाजता विसावला।शुक्रवारी योगिनी एकादशी असल्याने सर्व भाविकांचा उपवास असतो. वारीतील एकादशी जास्तीत जास्त शुद्ध आचारणाने करीत वारकऱ्यांची वाटचाल सुरू होती. पहाटे साडेपाच वाजता विश्वस्त सूर्यकांत मोरे यांच्या हस्ते पादुकांची पूजा झाली. शहरातील दोन दिवसांचा मुक्काम आटोपून शुक्रवारी सकाळी सहा वाजता सोहळा पुढे मार्गस्थ झाला. काकड आरतीच्या अभंगांनी पुणेकरांना जागे करीत भैरोबा नाला येथे पहिल्या विश्रांतीसाठी सोहळा नऊ वाजता पोचला. एकादशीमुळे सकाळपासूनच रस्त्याच्या दुतर्फा अनेक जण केळी, शेंगदाणे, राजगिरा लाडू, चिवडा अशा उपवासाच्या पदार्थांचे वाटप वारकऱ्यांना करत होते. पालख्यांचा मुक्काम दुपारी हडपसर येथे होता. तेथे भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. ऊन्ह-सावल्यांच्या खेळ रंगलेला असतानाच सोहळा सोलापूर महामार्गाने पुढे मार्गस्थ झाला. मांजरी फाटा, मांजरी येथे दर्शनासाठी अनेक भाविक रस्त्याच्या कडेला थांबलेले होते. मांजरी फार्म येथे हवेली तालुक्याच्या वतीने सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. सभापती प्रभावती भूमकर, उपसभापती बंडू खांदवे, गटविकास अधिकारी विक्रांत बगाडे, सदस्या भारती शिक्रे या वेळी उपस्थित होत्या. सर्व वारकऱ्यांना राजगिऱ्याच्या लाडवांचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर प्रत्येक दिंडीतील वीणेकऱ्याला उपरणे, तसेच औषधाचे "किट' वाटण्यात आले. या "किट'मध्ये अंगदुखी, ताप, थंडी यांच्या गोळ्या आहेत. पिंपरी-चिंचवडकरांचे, पुणेकरांचे आदरातिथ्य घेऊन सोहळा हडपसरनंतर ग्रामीण भागात वाटचाल करू लागला. काळीभोर जमीन, हिरवीगार शेती असा परिसर सुरू झाला. द्राक्षे, ऊस, केळी, भाजीपाला, हरितगृहातील फुलशेती असे या परिसरातील चित्र आहे. त्यातच पावसाचा शिडकावा आल्याने वातावरण अधिकच उत्साही बनले. सायंकाळी पावणेआठ वाजता समाज आरती झाल्यानंतर सोहळा मुक्कामी विसावला. शुक्रवारी रात्री केसापुरीकरांचे कीर्तन झाले. शनिवारी सकाळी सहा वाजता देहूकरांचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर आठ वाजता सोहळा यवतच्या दिशेने मार्गस्थ होईल.

Subscribe to:
Posts (Atom)